डिजिटल आर्मी, शॅडो आर्मी विद्वेषाचं बीज पेरून समाजाचे ध्रुवीकरण करत आहेत
आज काही विघातक शक्ती गांधी-नेहरूंना फाळणीसाठी जबाबदार धरत आहेत. गांधी हे भारताची आयडेंटीटी आहेत. त्यांचा विचार संपवणं अशक्य कोटीतली गोष्ट आहे. म्हणून गांधीजींना हायजॅक करायचं आणि नेहरूंना मलिन करायचं, असा दुहेरी कुटील डाव ही प्रतिगामी मंडळी करत आहेत. ‘नेहरूंनी केलं ते सगळं वाईट’ असं बिंबवण्याचा प्रयत्न केला जातोय.......